पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र दुष्काळसदृश्य स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठीच्या उपाययोजनांचं निवेदन सादर केलं.
पंकजा मुंडे यांनी जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी, समांतर प्रवाही कालव्याद्वारे माजलगाव धरणात आणून, त्याद्वारे सिंदफना, कुंडलिका, वाण, मनार आणि मांजरा उपखोऱ्यात वळविणेबाबतचे निवदेन पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिले. याविषयी पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे
पंकजा यांनी ट्वीट मध्ये ‘मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली जायकवाडी मधील पाणी माजलगाव व तिथून खडका आणि नागापुर धरणात आणण्यासाठी व बीड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील दुष्काळासाठी कायम उपाय करण्यासाठी च्या उपाय योजनांचे निवेदन दिले त्यांनी जलसंपदा मंत्री याना तात्काळ बैठक करायचे सांगितले.
click and follow Indiaherald WhatsApp channel