प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मराठी रंगभूमीवरील मानाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ नोव्हेंबरला प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोहिणी हट्टंगडी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे.
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये आजही त्यांची भूमिका पाहायला मिळते. त्यांना आत्तापर्यंत ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘अर्थ’ आणि ‘अग्निपथ’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार तसंच २०१७ मध्ये बालगंधर्व परिवारातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाच्या विष्णुदास भावे या पुरस्कारावरही त्यांच नाव कोरले जाणार आहे. २५ हजार रुपये रोख, विष्णुदास भावे पदक, स्मृती चिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरम्यान, विष्णुदास भावे’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीतील अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करत आली आहे. सांगली येथील ही समिती आणि राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी रंगभूमीदिनी दिवशी हे मानाचे पदक दिले जाते.मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्या ज्येष्ठ कलाकारास या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
click and follow Indiaherald WhatsApp channel