स्मार्टफोन उत्पादक चीनी कंपनी शाओमीने आपल्या भारतातील ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना अवघ्या 5 मिनिटांत एमआय क्रेडिट सर्व्हीसच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. महिन्याच्या हप्त्यांमध्ये हे कर्ज फेडता येणार आहे. शाओमीने या सुविधेसाठी इंस्टंट लोन देणारी कंपनी KrazyBee सोबत हातमिळवणी केली आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटल पर्सनल फायनान्स, मनी व्ह्यू, अर्लीसॅलरी, क्रेडिटविद्या आणि झेस्टमनी हे एमआय क्रेडिटसाठी कर्ज देणारे भागीदार आहेत. 5 मिनिटांपेक्षा जास्त कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही प्रक्रिया शंभर टक्के डिजिटल असल्याचे शाओमीनेही म्हटले आहे. वापरकर्त्यांना अॅपवर विनामूल्य क्रेडिट स्कोअर देखील मिळणार आहे.
वापरकर्त्यास कर्ज घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन एमआय क्रेडिट अॅप डाउनलोड करावा लागेल. आवश्यक परवानग्या अॅपला दिल्यानंतर, तुम्हाला ‘गेट नाउ’ बटणावर क्लिक करुन फोन नंबर प्रविष्ट करावे लागेल. त्यानतंर लॉगिन करावे लागेल. वापरकर्त्याला येथे त्याची सर्व माहिती भरावी लागेल.
यानंतर वापरकर्त्याला पॅनकार्डचा फोटो तसेच नाव, लिंग आणि जन्मतारखेची माहिती अपलोड करावी लागेल. वापरकर्त्याला यानंतर अॅड्रेस प्रूफ आणि सेल्फी अपलोड करावे लागतील. कंपनीच्या पात्रतेनुसार किती कर्ज दिले जात आहे, याची माहिती स्क्रीनवर दिसेल. कंपनी वैयक्तिक कर्जावर दर महिन्याला 1.35 व्याज असेल. तुम्ही 91 दिवस ते 3 वर्षांच्या कालावधीत हे कर्ज फेडू शकता.
click and follow Indiaherald WhatsApp channel