भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामधील दुसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू मोहालीमध्ये पोहचले आहेत. मात्र येथे चंदीगडच्या पोलिसांनी भारतीय संघाला सुरक्षा देण्यास नकार दिला. 16 सप्टेंबरला भारतीय संघ चंदीगड विमानतळावर पोहचल्यावर चंदीगड पोलिसांनी सुरक्षा दिली नाही.
चंदीगड पोलिसांनी सुरक्षा देण्यास नकार दिल्याने, मोहाली पोलिसांना संघाच्या सुरक्षेसाठी जावे लागले. बीसीसीआयने चंदीगड पोलिसांचे थकबाकी 9 करोड रूपये दिले नसल्याने, चंदीगड पोलिसांनी सुरक्षा देण्यास नकार दिला. यामुळे चंदीगडच्या हॉटेलमध्ये देखील खाजगी सिक्युरिटी देण्यात आली.
भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील धर्मशाला येथील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दुसरा टी 20 सामना 18 सप्टेंबर रोजी मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel