पाकिस्तान संघाला श्रीलंकेने त्यांच्याच घरच्या मैदानावर पाणी पाजले. श्रीलंकेने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-0ने क्लिन स्विप दिला. तर, पहिल्यांदा श्रीलंकेने 3-0ने टी-20 मालिका जिंकली. टी-20मध्ये पाकिस्तानचा संघ सध्या पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे हा पराभव पाक संघासाठी लाजीरवाणा आहे. त्यामुळे पाकचे चाहते भडकले आहेत.
आठव्या क्रमांकावर असलेल्या संघाने पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाचा पराभव केल्यानंतर चाहते चांगलेच भडकले आहेत. दरम्यान, या पराभवानंतर चाहते एवढे भडकले की, त्यांनी पाक कर्णधार सर्फराज अहमदच्या पोस्टरला लाथा-बुक्क्यांनी तुडवले. सर्फराजचा पोस्टर फाटेपर्यंत या चाहत्याने त्याला लाथा मारल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहता सर्फराजला या व्हिडीओमध्ये लाथा बुक्क्यांनी मारताना दिसत आहे.
दरम्यान, श्रीलंकेने तिसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत 147 धावा केल्या. तर, पाकिस्तान संघाला केवळ 134 धावा करता आल्या. या टी-20 मालिकेत पाकिस्तानला फक्त 4 षटकार लगावल्यामुळे चाहत्यांनी पाकिस्तानी संघावर टीका केली आहे. तर, माजी पाक कर्णधार रमीज राजाने प्रशिक्षक मिस्बाह उल-हकला प्रशिक्षक पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel