कोरोना व्हायरसवर करण्यात आलेले वेगवेगळे संशोधन समोर येत आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग ठेवण्यास सांगितले जात आहे. मात्र आता एका संशोधनात सोशल डिस्टेंसिंग जास्त फायदेशीर नसल्याचे सांगण्यात आले आहे.

 

संशोधनात सांगण्यात आले आहे की, कोरोनाग्रस्त खोकला अथवा शिंकल्यामुळे व्हायरस हवेत 8 मीटरपर्यंत प्रवास करू शकतो व अनेक तास हवेत राहू शकतो. त्यामुळे लोकांनी एकमेकांमध्ये 1-2 नव्हे तर 8-9 मीटर अंतर ठेवावे.

 

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात सांगितले की, खोकला, शिंक आणि श्वसन प्रक्रियाद्वारे गॅस क्लाउड बनतात. याशिवाय सध्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि सीडीसीचे निर्देश 1930 च्या जुन्या मॉडेलवर आधारित आहेत.


या संशोधनाच्या लेखिका आणि एमआयटीच्या असोसिएट प्राध्यापक लीडिया बाउरोउइबा यांनी चेतावणी दिली आहे की, खोकला आणि शिंकल्याने रुग्णाच्या तोडांतून निघणारे व्हायरसयुक्त सुक्ष्म थेंब 23 ते 27 अथवा 7 ते 8 मीटर पर्यंत जाऊ शकतात.  एमआयटीच्या वैज्ञानिकांनुसार, नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की खोकला किंवा शिंकण्यामुळे हवेने भरलेले ढग तयार होतात, जे हेवत लांब प्रवास करतात. या ढगात वेगवेगळ्या आकारांचे थेंब आहेत, जे वेगवेगळ्या अंतरावर हवेत पोहोचतात.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: