औरंगाबाद : शहरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज सकाळीच शहरात कोरोनाचे 23 नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर परत एकदा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत 5 रुग्णांनी वाढ झाली आहे.

 

सदरील रुग्णांमध्ये टाऊन हॉल परिसरातील 2 रुग्ण, किले अर्कमधील 1 रुग्ण, संजयनगरमधील 1, रुग्ण, आणि गौतमनगरमधील 1 रुग्णाचा समावेश असल्याची माहिती शल्य चिकित्सकांनी दिली आहे. दर दिवसाला कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं शहरातील नियम अधिकच कडक करण्यात आले आहे.


सध्या औरंगाबाद शहर ऑड इव्हन फॉम्यूल्यानुसार म्हणजेच सम आणि विषम तारखेनुसार सुरू आहे. सम तारखेला शहरातील दुकाने 7 ते 11 खुली असणार आहे.


तर विषम तारखेला संपुर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहून नियमाचं पालन करणं गरजेच आहे. कुणीही घराबाहेर पडू नये अशा सुचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: