मुंबई : महाराष्ट्रात काल दिवसभरात 1 हजार 602 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27 हजार 524 इतकी झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात 44 जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.

 

तसेच काल 512 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 6 हजार 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

 

दरम्यान काल झालेल्या 44 मृत्यूंपैकी 25 मृत्यू मुंबईत, 10 मृत्यू नवी मुंबईत, 5 मृत्यू पुण्यात, 2 मृत्यू औरंगाबादमध्ये, 1 मृत्यू पनवेलमध्ये आणि 1 मृत्यू कल्याण डोंबिवलीत झाला आहे. नवी मुंबईत 14 एप्रिल ते 15 मे या कालावधीत 10 मृत्यू झाले होते.

 

या मृतांचाही आजच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं मोठी चिंता निर्माण झाली आहे. काल 44 जण मृत्यूमुखी पडले आहे. यामध्ये 31 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे.

यापैकी 21 रुग्णांचं वय हे 60 वर्षापेक्षा अधिक 20 रुग्णांचं वय 40 ते 59 या वयोगटातील तर तीन रुग्णांचं वय 40 वर्षाच्या खालील असल्याची माहिती आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: