मुंबई- सध्या चित्रपटसृष्टीत ‘साहो’ची जोरदार चर्चा सुरू आहे. बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर अभिनेता प्रभास आता ‘साहो’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, ‘साहो’ने (हिंदी) प्रदर्शनाच्या पहिल्याच बॉक्स ऑफिसवर 24.40 कोटी रुपयांची चांगली कमाई केली आहे. या कमाईसोबत ‘साहो’ने यावर्षी सर्वात मोठी ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
ऍक्शन लव्हर्स प्रेक्षकांना साहो चित्रपट नक्की आवडेल, असा मालमसाला यामध्ये ठासून भरलेला आहे. त्यामुळे चित्रपटला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ‘साहो’ने आलिया भट्टच्या ‘कलंक’ आणि अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या चित्रपटांच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel