काल १३ सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर आयुष्मान खुराणा आणि नुसत भरुचा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल’ चित्रपट रिलीज झाला. चित्रपट विश्लेषकांच्या उत्तम प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांचा तुफान या चित्रपटाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई आता समोर आली आहे.
१०.०५ कोटींची कमाई या चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नवा विक्रम रचला आहे. आयुष्मानच्या फिल्मी करिअरमधील हा चित्रपट बिगेस्ट ओपनर ठरला आहे. आतापर्यंत आयुष्मानच्या ‘बधाई हो’ने ७.३५, ‘आर्टिकल १५’ ५.०२, ‘शुभ मंगल सावधान’ २.७१, ‘अंधाधून’ २.७० तर ‘बरेली की बर्फी’ने २.४२ कोटींचा गल्ला पहिल्या दिवशी जमावला होता.
याशिवाय ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’, ‘लुका छुपी’ आणि ‘छिछोरे’ या चित्रपटांपेक्षाही अधिकचा गल्ला ‘ड्रीम गर्ल’ने पहिल्या दिवशी जमावला आहे. अशात आता शनिवार रविवारच्या सुट्टीचा फायदाही कलेक्शनला होणार असल्यामुळे, हा चित्रपट आणखी कोणते नवे विक्रम रचणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel