भारताची आघाडीची रेसलर, सुवर्णपदक विजेती आणि दंगल गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळालेली गीता फोगट आई बनली असून मंगळवारी तिने मुलाला जन्म दिला आहे. ट्विटरवर गीताने नवजात बाळ आणि पती पवनकुमार सोबत फोटो शेअर केला आहे.
फोटोसोबत ती लिहिते, हॅलो बॉय, जगात आपले स्वागत. तो इथे माझ्यासोबत आहे, खूप छान वाटतेय. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असुदेत. आमचे जीवन या बाळाने परिपूर्ण केले आहे. आपला रक्ताचा मुलगा जन्म घेताना पाहणे हा आनंद काय असतो तो शब्दात वर्णन करता येणारा नाही. तीन वर्षापूर्वी २० नोव्हेंबर रोजी हरियाणाची गीता आणि पवनकुमार यांचा विवाह झाला असून गीता आणि तिची बहिण बबिता यांच्यावर निघालेल्या दंगल चित्रपटाने इतिहास घडविला होता.
click and follow Indiaherald WhatsApp channel