मागील अनेक वर्षांपासून अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची चर्चा सुरु होती. या चित्रपटाची औपचारिक घोषणा आज शिवजयंतीनिमित्त करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार असल्याचे आता स्पष्ट झाले असून या चित्रपटाच्या घोषणेचा टीझर नागराज मंजुळेनेच ट्विट केला आहे.
नागराज मंजुळेंनी हा टीझर ट्विट करताना त्याला एक कॅप्शन दिले आहे. त्यानुसार एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित…आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी… शिवाजी…राजा शिवाजी…छत्रपती शिवाजी…शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा असे म्हणत नागराजने चित्रपटाच्या घोषणेचा ३० सेंकदांचा टीझर पोस्ट केला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel