मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीची नोटीस आली आहे. मुंबईतील कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी राज यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस धाडल्याने मनसे आक्रमक झाली आहे. तर भाजप नेते विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशी बाबत सल्ला दिला आहे.
दोषी नसाल तर घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे जावा, असा सल्ला विनोद तावडे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात टाकले जात आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची चाल आहे, अशी प्रतिक्रिया मनसेकडून दिली जात आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर असल्याची टीका केली आहे, सत्ताधारी भाजप सूडबुद्धीने वागत आहे, जो तुमची प्रकरणे बाहेर काढेल, जो तुमच्या विरोधात बोलेल त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel