मुंबई -कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून त्यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ईडीच्या नोटीसीवरून राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभुमीवर मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत 22 तारखेला राज ठाकरेंसोबत ईडी कार्यालयाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, राज ठाकरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. “माझ्यावर आतापर्यंत अनेक खटले दाखल झाले. प्रत्येक वेळी आपण सर्वांनी तपास यंत्रणा व न्यायालयाचा आदर केला आहे. आताही तेच करू. त्यामुळं येत्या 22 ऑगस्टला शांतता राखा. कुणीही ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर जमू नका. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी शांत राहा. बाकी या विषयावर मला जे बोलायचं आहे ते योग्य वेळी बोलेनच”. असं राज ठाकरेंनी म्हंटल आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel