भारतीय सिनेसृष्टीत गेल्या काही काळापासून ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पानिपत’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘तान्हाजी’ यांसारख्या चित्रपटांनी तिकीटबारीवर धमाल उडवल्यानंतर आता लवकरच बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या आगामी चित्रपटाची माहिती दिग्दर्शक अभिजीत देशपांडे याने ट्विट करुन दिली.
‘पावन खिंड’असे या आगामी चित्रपटाचे नाव असून बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटात बाजीप्रभू यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. एका नेटकऱ्याने नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून संजय दत्तला या चित्रपटात बाजीप्रभू यांच्या भूमिकेसाठी कास्ट करण्याची विनंती केली होती. अभिजीतने त्याच्या विनंतीवर ओके अशी प्रतिक्रिया दिली. यावरुन पावनखिंडमध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत झळकणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी यांनी घोडखिंडीमध्ये सिद्धीच्या सैन्याला रोखून ठेवले होते. हजारोंच्या सैन्याला रोखून धरलेल्या बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने १०-१२ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने ‘घोडखिंड’ पावन झाली म्हणूनच तिचे नाव ‘पावनखिंड’ झाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel