राहुरी : मुख्यमंत्री शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत की काय असे आम्हाला वाटू लागले आहे, त्यामुळे राहुरी येथे मुख्यमंत्र्यांची होणारी महाजनादेश यात्रा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रोखण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन तहसिलदारांना छावा संघटनेचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे व राहुरी तालुका प्रमुख रमेश म्हसे यांनी दिले.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, दुष्काळ हाच निकष लावून खरिपातील प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई करणे, पिकविमा रक्कम अदा करणे, सरसकट वीजबिल माफ करणे या मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे यांनी औसा (जि.लातूर) तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले असून, त्याला पाठिंबा म्हणून यात्रा रोखण्यात येणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel