मराठवाड्यातला दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी कोकणातून पाणी आणलं जाईल, यामुळे मराठवाड्यातल्या भावी पिढ्यांना दुष्काळ पाहावा लागणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं महाजनादेश यात्रे दरम्यान जाहीर सभेत ते काल बोलत होते.
औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेला संबोधित करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी समृध्दी महामार्ग तयार झाल्यानंतर उद्योगांचं मॅग्नेट औरंगाबाद – जालना शहरादरम्यान राहील, असं सांगितलं. दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिका -डीएमआयसीमध्ये अनेक उद्योग येऊ घातले असून मोठ्या प्रमाणावर रोजगारीचा प्रश्न सुटणार असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी सरकार कटीबध्द असून पिण्याच्या पाण्यासाठी सोळाशे कोटी रूपयांची योजना आणणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. ते म्हणाले..
औरंगाबाद सभेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, ३-४ वर्ष आम्ही त्याठिकाणी लक्ष घातलं, सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन लढलो. शेवटी सांगितलं , याचं नायनाट होऊद्या. आता जो नवीन भाग आलाय या भागासहित योजना तयार करा. सोळाशे कोटी रूपयाची योजना तयार झाली. राज्य सरकार मंजूर करेल आणि पाण्यापासून वंचित राहू देणार नाही.याशिवाय औरंगाबाद शहरातल्या रस्त्यांसाठी आणखी २०० कोटी रूपये राज्य सरकार देईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel