राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 हजार 063 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 1089 रुग्ण आढळून आले आहे. तसेच आज राज्यभरात 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या 37 मृत्यूंपैकी 19 पुरुष तर 18 महिला होत्या.

 

या 37 जणांमध्ये 17 रुग्ण असे होते ज्यांचं वय 60 वर्षे किंवा त्यावरचं होतं. तर 16 रुग्ण असे होते ज्यांचं वय हे 40 ते 59 वर्षे असं होतं. ज्या 37 रुग्णांचा मृत्यू झाला त्या 37 रुग्णांमध्ये 27 जण असे होते ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार अशा गंभीर आजारांचा पूर्व इतिहास होता.


गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 19 हजार रुग्ण आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईतील 12 हजार रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतल्या धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं मुंबईची चिंता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

 

धारावीत आतापर्यंत कोरोनाचे जवळपास 800 रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत सुद्धा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत राज्यात 3 हजार 470 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहे. 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: