लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गट नेते हणमंत जगदाळे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.
ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसापासून धुसफूस सुरु असून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्येशैलीवर नगरसेवक नाराज आहेत. जगदाळे यांचे नावही या नाराज नगरसेवकामध्ये होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असून त्यांची पुढची पावले काय असतील याबाबत त्यांनी अद्याप घुलासा केलेला नाहीये.
दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे हे ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये गेले होते. आव्हाड यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळूनच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांतर आत्ता जगदाळे यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel