भाजपमध्ये प्रवेशासाठी विरोधी पक्षांची रांग लागलीय. भाजप प्रवेशाची ही गर्दी कमी होण्याची शक्यता नाही अशीच चिन्हे आहेत. असं वातावरण असतानाच भाजपमध्ये येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा मेगाभरती होईल असं भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
राज्यात विरोधी पक्षांची स्थिती गंभीर होईल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. लाड यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांची चिंता वाढणार आहे. त्याच बरोबर लाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय.
लाड म्हणाले, आरे मेट्रो कारशेडला विरोध करणं चुकीचं आहे. विकासासाठी पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. सुप्रिया सुळे यांनी आज आरे मेट्रो कारशेडला विरोध करत आंदोलनात सहभाग घेतला. लाड यांनी सुळे यांच्या या भूमिकेवरही टीका केली.
click and follow Indiaherald WhatsApp channel