आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र माजी राज्यमंत्री नारा लोकेश यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी टीडीपी प्रमुख आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच अमरावतीमधिल घरात नजरकैदेत ठेवलं आहे.
आंध्र प्रदेशात टीडीपीच्या नेत्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या निषेधार्थ आणि राज्यातील वायएसआर काँग्रेस सरकारच्या विरोधात ए. चंद्राबाबू नायडू यांनी आज (११ सप्टेंबर) सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत ‘चलो आत्मकूर’ आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला आहे. टीडीपी प्रमुखांनी नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर आज आपल्या घरी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.
नायडू यांच्या घोषणेनंतर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्यांच्या घरी जात होते. मात्र पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना थांबवलं असून ताब्यात घेतलं आहे. ’चलो आत्मकूर’ आंदोलनात सहभागी होणारे आंध्रप्रदेशचे माजी मंत्री आणि तेदेपा नेते भूमा अखिला प्रिया यांना नोवोटेल हॉटेलमध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक ताब्यात घेतलं आहे. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात टीडीपीचे माजी आमदार तांगीराला सौम्या यांना नंदीगामा शहरातल्या त्यांच्या घरातून अटक केली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel