आदित्य माझ्यापेक्षाही जास्त मेहनत करतोय, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवसेना आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले आहे. आज काँग्रेसचे नंदूरबार जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत रघूवंशी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रघूवंशी यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ठाकरे म्हणाले की, निवडणुकीसाठी आदित्य आज माझ्यापेक्षाही जास्त मेहनत करत आहे. नुकतेच आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याची घोषणा केली. या वेळी भव्य कार्यक्रम करण्यात आला मात्र या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. याबाबतही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. आदित्यला दडपण येऊ नये म्हणून मी वरळीतील मेळाव्याला उपस्थित नव्हतो, असे ते म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची एक आठवण सांगितली. बाळासाहेब म्हणायचे या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर तू माझा मुलगा म्हणून तुला शिवसैनिकांवर लादणार नाही आणि तू माझा मुलगा म्हणून तुला अडवणारही नाही.
तू तुझे काम कर, शिवसैनिकांनी स्वीकारले तर तू पुढे जा, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच 8 ऑक्टोबरच्या दसऱ्या मेळाव्यात निवडणुकी विषयी बोलणार आहे. कारण काही ठिकाणी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel