नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देशातील माध्यमांच्या कामगिरीवर खुली नाराजी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या कार्यक्रमात बोलताना नायडू म्हणाले की, बातमी आणि विचार दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
कधीही बातम्यांद्वारे अर्थाचा अनर्थ केला जात नसे परंतु आता बातमी आणि बातमी लिहणार्याचे मत एकत्र करून मांडले जाते ही खूप मोठी समस्या आहे. नायडू म्हणाले की, स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी अनेक व्यवसायी आणि मोठ्या राजकीय पक्षांनीसुद्धा वृत्तपत्र आणि वाहिन्या सुरु केल्या आहे.
खळबळजनक बातम्या देणे जसे काही माध्यमांनी कार्याचा भाग बनवून टाकेल असून पत्रकारितेची तत्वे हळूहळू समाप्त होत असल्याची खंत उपराष्ट्रपती यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, राजकीय पक्षांनी माध्यम क्षेत्रात भाग घेणे चुकीचे नाही परंतु त्यांनी पहिले स्पष्ट करावे की कोणत्या पक्षाचे कोणते वृत्तपत्र किंवा वाहिन्या आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel