पुणे – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५४ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनामध्ये बोलताना भारतात राहत असाल, तर भारत माता की जय म्हणावेच लागेल. जे लोक असे म्हणतील, तेच भारतात राहू शकतील, असे वक्तव्य केले आहे.
प्रधान यावेळी बोलताना, त्यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला विरोध करणाऱ्या लोकांना लक्ष्य केले. या देशाला भगत सिंग आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले. या देशाला हे एनआरसीला विरोध करणारे लोक धर्मशाळा बनवणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपला देश धर्मशाळा नाही, की कोणीही येऊन येथे भटकू शकेल. त्यामुळे एनआरसीचे हे आव्हान आपल्याला पेलावेच लागेल. तसेच, केवळ त्याच लोकांना येथे राहू दिले जावे, जे की ‘भारत माता की जय’ म्हणतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
click and follow Indiaherald WhatsApp channel