प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर काम करायला आम्हाला नक्कीच आवडेल. मात्र ते नेहमीच आमच्यापासून दूर राहिलेले आहेत. सामाजिकदृष्ट्या आम्ही एकत्र काम केलं पाहिजे, असं माझं मत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, ‘वंचित बहुजन आघाडी’ ही भाजपची ‘बी टीम’ कधीच असू शकत नाही. कारण प्रकाश आंबेडकरांनी नेहमीच भाजपवर टीका केलेली आहे, असा दावा पाटील यांनी केला. स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर यासंदर्भात चर्चा सुरु आहे. ते कोणाबरोबर कम्फर्टेबल आहेत, यावरुन निर्णय घेऊ, असे पाटील म्हणाले.
‘छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel