अहमदाबाद – 2015 च्या एका देशद्रोहाच्या प्रकरणात काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी रात्री अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाव येथून अटक करण्यात आली. पटेल यांच्याविरोधात देशद्रोहाच्या प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पटेल यांच्याविरोधात अहमदाबादच्या एका न्यायालयाने शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. हार्दिक पटेल सुनावणी दरम्यान सातत्याने अनुपस्थित राहिल्यामुळे अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती आहे. आज हार्दिक पटेलला न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, 25 ऑगस्ट 2015 रोजी हार्दिक पटेल यांनी पाटीदार आरक्षण समर्थनार्थ अहमदाबाद येथे एक रॅली काढली होती. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. पोलिसांनी त्यावेळी हिंसाचाराप्रकरणी हार्दिक आणि सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.                                                                                                                                                

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: