मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने रेशन दुकानांमधून पुढील तीन महिन्यांसाठी प्रति महिना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

मात्र याच पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदुळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणूक करणे जिकीरीचे होईल. ही बाब रेशन दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली.

तसेच केंद्र सरकारने ३० मार्च रोजी मोफत तांदुळ देण्याच्या निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांत धान्याची वाहतूक करण्यासाठी मयार्दा असल्यामुळे त्या-त्या महिन्यामध्ये, धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

‘प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला त्याने नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर,प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ त्या त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: