बुंदेल शहरात झालेल्या दोन साधुंच्या हत्येचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर वरुन या घटनेवर भाष्य करत घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
‘अत्यंत निघृण आणि अमानुष! ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा.योगी अदितयनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील.’ असे त्यानी यावेळी ट्विट केले आहे .
महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधूंच्या मॉब लिंचिंगनंतर उत्तर प्रदेशमध्ये साधूंच्या हत्येची घटना समोर आली आहे. बुलंदशहरच्या अनुपशहर भागात मंदिर परिसरात झोपताना दोन साधूंवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. घटनेत मुरारी या गावचे व्यसनाधीन व्यक्तीचे नाव समोर आले आहे. त्याला ताब्यात घेऊन पोलिस विचारपूस करत आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel