सातारा : बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकले काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. अभिजीत बिचुकलेने यापूर्वी अनेक निवडणुका लढवल्या आहेत.
आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्यांना सल्ला दिला आहे. अभिजीत बिचुकलेच्या नावाचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
कोरोनामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याबाबतचे आदेश द्या, असं या पत्रात अभिजीत बिचुकलेने म्हटलं आहे. कोरोनाने जगभरात कहर माजवला आहे. 15 वर्षाखालील मुले ही भारताचं भविष्य आहे.
या वयात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही किंवा कोरोनाची साखळी तुटत नाही, तोपर्यंत यंदाच्या वर्षी सर्व शाळा-कॉलेज बंद करा, असं बिचुकलेने म्हटलं आहे.
तसंही अनेक राज्यात इयत्ता नववी पर्यंत श्रेणी पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे मुलांना शाळेत बोलवण्यापेक्षा वर्षभर शाळा बंद ठेवा. अन्यथा शाळा सुरु झाल्या तर खेळण्या-बागडण्याच्या नादात मुलं सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाहीतच. त्यामुळे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढेल, असंही बिचुकलेने म्हटलं आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel