सिनसिनॅटी मास्टर्स पुरूषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या रिचर्ड गॅसकेटने ब्रिटनच्या अँडी मरेला पहिल्या फेरीतच पराभवाच स्विकारावा लागला आहे. पुरूष एकेरीच्या सामन्यात रिचर्ड गॅसकेटने अँडी मरेचे आव्हान 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले.
दरम्यान, मरेने आतापर्यंत तीन वेळा ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांची कमाई केली आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी त्याला रॉबर्टो बॅटिस्टा ऍग्यूटकडून पाच सेट्सच्या लढतीनंतर पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्याला स्नायूंच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्याला स्पर्धात्मक टेनिसपासून सात महिने दूर रहावे लागले होते.
click and follow Indiaherald WhatsApp channel