करोना व्हायरसमुळे सध्या चित्रपट, मालिकांचे शुटींग बंद आहे. मात्र त्यामुळे सध्या कलाकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाले आहेत. सेलेब्रेटी ट्वीट, फोटो,व्हीडीओच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांना करोनापासून कसा बचाव करायचा असे उपदेश करताना दिसतात. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक शगुफ्ता रफीक यांनी करोना व्हायरसशी संबंधीत एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘जीथे देवाचे प्रयत्न संपले आहेत, अशावेळी आपला इलाज करणारे डॉक्टर किती सुरक्षीत असतील’.

 

शगुफ्ता रफीकने ट्वीटमध्ये पुढे लिहीले आहे की, देव माणसांना वाचवायचा असफल राहीला आहे. त्यात आपले डॉक्टर किती सुरक्षीत असतील जे आपला इलाज करत आहेत. शगुफ्ता रफीक यांच्याबरोबर राम गोपाल वर्मा, अनुभव सिन्हा, अनुराग कश्यप अशा अनेक कलाकारांनी करोना व्हायरसला घेऊन सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहेत.

 

करोनामुळे सध्या सगळे घरातच बसले आहेत. अमेरिकन अभिनेत्री वनेसा ह्युजेन्स हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत ती म्हणतेय, “करोना विषाणूचा फैलाव आणि रुग्णांचं विलगीकरण करणं हा मूर्खपणा आहे. हा व्हायरल आहे हे मला माहित आहे. पण जर का प्रत्येकाला त्याची लागण झाली तर लोकं मरणारच आहेत. हे भयानक आहे, पण टाळताही येणारं नाही.” वनेसाच्या या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. या कारणामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: