ही योजना एखाद्या सायन्स फिक्शऩ सारखी वाटत असेल. मात्र पुढील दहा वर्षात ही योजना सत्यात उतरणार आहे. या योजनेच्या अंतर्गत दररोज 800 पेक्षा अधिक विमान लाखो टन मातीला पृथ्वीच्या 19 किलोमीटर वरती घेऊन जाऊन स्ट्रेटोस्फीयरमध्ये टाकणार आहेत.

या धूळीमुळे पृथ्वीच्या मदतीने स्ट्रेटोस्फीयरमध्ये धुळेच एक आवरण तयार होणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुर्याची किरणे आणि उष्णता अंतरिक्षमध्ये परत जाईल. पृथ्वीवर वाढणाऱ्या उष्णतेला रोखण्यास हे मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. या खास प्रोजेक्टवर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि हार्वर्ड युनिवर्सिटीचे वैज्ञानिक काम करत आहेत.

या योजनेच्या सुरूवातीच्या परिक्षणावर जवळपास 21 करोड रूपये खर्च होतील. याअंतर्गत न्यू मॅक्सिको वाळवंळात 19 किलोमीटर वरती जाऊन सायटंफिक फुगा दोन किलो चुनखडी पसरवेल. यामुळे आकाशात ट्यूबच्या आकाराचा जवळपास पाऊण किलोमीट लांब आणि 100 मीटर व्यासाचे क्षेत्र तयार होईल. या फुग्यावर लागलेले सेंसर धुळेमुळे सुर्याची किरणे परावर्तित होणारा दर आणि आणि हवेवर होणाऱ्या प्रभावाचे विश्लेषण करतील.

गंभीर चेन रिएक्शन होऊ नये तसेच, दुष्काळ आणि वादळ येण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हा प्रयोग सध्या थांबवण्यात आला आहे. तसेच एक भिती ही देखील आहे की, धुळीच्या थरामुळे ओझनच्या थराला काही नुकसान तर होणार नाही.

हार्वर्ड टीमचे एक सदस्य लीजी बर्न्स सांगतात की, ही आयडिया धोकादायक आहे. मात्र तेवढेच भितीदायक वातावरणामध्ये होणारे परिवर्तन देखील आहे. त्यामुळे याच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी पँनलची नेमणूक करण्यात आली आहे. या योजनेची प्रेरणा 1991 मध्ये फिलीपींसचा माउट पिनाटूबो ज्वालामुखीमध्ये विस्फोट झाल्यामुळे आली होती. या विस्फोटामुळे 700 लोकांचे प्राण गेले होते तर 2 लाख लोक बेघर झाले होते. मात्र यामुळे वैज्ञानिकांना यावर अभ्यास करण्याची संधी मिळाली.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: