नोकियाने आपला पहिला स्मार्ट टिव्ही भारतात लाँच केला आहे. कंपनीने फ्लिपकार्टसोबत मिळून हा टिव्ही तयार केला आहे. या टिव्हीत 55 इंच यूएचडी डिस्प्ले मिळेल. अँड्राईड 9.0 वर बेस्ड या टिव्हीत सुपेरियर साउंड क्वालिटीसाठी जेबीएल टेक्नोलॉजी आणि 24 वॉट स्पीकरचा वापर करण्यात आलेला आहे. या स्मार्ट टिव्हीत क्वॉडकोर प्रोसेसर आणि 16 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज मिळेल. 10 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर या टिव्हीची विक्री सुरू होईल.
नोकियाच्या या स्मार्ट टिव्हीची किंमत 41,999 रुपये आहे. या किंमतीत ग्राहकाला टिव्हीसोबतच स्टँड आणि वॉल माउंट देखील मिळेल. सोबतच ब्लूटूथ रिमोट मिळेल, जो गुगल असिस्टेंट सपोर्ट असेल. टिव्हीत 55 इंच यूएचडी डिस्प्ले मिळेल. ज्यात 400 निट्सपर्यंत ब्राइटनेसची सुविधा मिळेल. यामध्ये डोल्बी व्हिजन सपोर्ट, एमईएमसी आणि चांगल्या व्हिज्युअल अनुभवासाठी इंटेलिजेंट डिमिंग फीचर देण्यात आले आहे. नोकियाच्या या स्मार्ट टिव्हीत 2.25 जीबी रॅम, 16 जीबी स्टोरेज, तीन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळेल.
click and follow Indiaherald WhatsApp channel