भारतात विवोने व्ही५ प्लस हा स्मार्टफोन लाँच केला असून २७ हजार ९८० रुपये इतकी या फोनची किंमत ठेवण्यात आली असून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर हा फोन खरेदी करता येऊ शकतो. आजपासूनया फोनची प्री-बुकिंग, तर विक्री १ फेब्रुवारीपासून होईल.
विवो व्ही ५ प्लसमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. २० मेगापिक्सेल आणि ८ मेगापिक्सेलचे दोन फ्रंट कॅमेरे या फोनमध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठी हा फोन एक पर्वणी ठरु शकतो. काही दिवसांपर्वी लाँच झालेल्या विवो व्ही5 या फोनचे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या फोनमध्येही २० मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
विवो व्ही५ प्लसमध्ये ५.५ इंच आकाराची स्क्रीन, २० मेगापिक्सल ड्युअल फ्रंट कॅमेरा, १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज, अँड्रॉईड ६.० सिस्टीम आणि ३१६० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

click and follow Indiaherald WhatsApp channel