सॅमसंगने आपला बहुप्रतिक्षित नवीन फोल्डेबल स्मार्टफोन ‘गॅलेक्सी झेड फ्लिप’ला सॅन फ्रॅन्सिस्को येथील एका इव्हेंटमध्ये लाँच केले आहे. या फोल्डेबल फोनमध्ये कंपनीने अल्ट्रा थिन ग्लासचा वापर केला आहे. यासोबत युजर्सला यूट्यूब प्रिमियमची सेवा देखील मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी झेड प्लिपमध्ये प्लेक्स मोड आहे. या बनविण्यासाठी कंपनीने गुगलसोबत काम केले आहे. याच्या मदतीने स्क्रीन फोल्ड केल्यावर काही अ‍ॅप्स स्पिल्ट स्क्रीन मोडमध्ये चालतील.

 

या फोनची किंमत 1,380 डॉलर (जवळपास 98,400 रुपये) आहे. हा फोन 14 फेब्रुवारीपासून ठराविक मार्केटमध्येच उपलब्ध केला जाणार आहे.  हा फोन मिरर ब्लॅक, मिरर पर्पल रंगात मिळेल. नंतर मिरर गोल्ड व्हेरिएंट देखील येणार आहे.

 

सॅमसंग गॅलेक्सी फ्लिप ड्युअल सिम स्मार्टफोन असून, यात एक ई-सिम आणि दुसरे नॅनो सिम वापरता येईल. या फोनमध्ये प्रायमेरी फोल्डेबल 6.7 इंच फुल-एचडी (1080×2636 पिक्सल, 21.9:9, 425 पीपीआई) डायनमिक एमोलेड पॅनेल डिस्प्ले आहे. बाहेरील बाजूला 1.1 इंच डिस्प्ले असून, याचे रिझॉल्यूशन 112×300 पिक्सल आहे.

या फोनमध्ये अँड्राईड 10 आणि ऑक्टो कोर प्रोसेसर मिळेलसॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिपमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा मिळेल. ज्यात एक कॅमेरा 12 मेगापिक्सल वाइड-अँगल आणि दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगला आहे. सेल्फीसाठी यात फ्रंटला 12 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 8 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आलेले आहे. यात मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट करणार नाही.

 

कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये यात 4जी एलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी, एनएफसी आणि जीपीएस (ए-जीपीएस) मिळेल. एक्सेलेरोमीटर, अँबियंट लाइट सेंसर, बॅरोमीटर, फिंगरप्रिंट सेंसर, जाइरोस्कोप, मॅग्नेटोमीटर औआणिर प्रॉक्सिमिटी सेंसर फोनचा भाग आहे.

फोल्ड केल्यावर या फोनचे डायमेंशन 87.4×73.6×17.33 मिलीमीटर आणि अनफोल्ड असल्यावर डायमेंशन 167.3×73.6×7.2 मिलीमीटर आहे. याचे वजन 183 ग्राम असून यात सिंगल मोनो स्पीकर मिळेल. यात 3,300 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, ही फास्ट चार्जिंग को सपोर्ट करते.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: