जर तुम्ही गुंतवणूक करून कमाई करण्याच्या विचारात असाल तर भारतीय रेल्वेच्या मालकीचे आयआरसीटीसी तुमच्यासाठी एक संधी घेऊन आले आहे. आयआरसीटीसीचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) लवकरच बाजारात येणार आहे. आयपीओ आल्याने तुम्ही आयआरसीटीसीमध्ये गुंतवणूक करू शकता.आ
यआरसीटीसीचे आयपीओ 30 सप्टेंबरला सुरू होईल. याद्वारे आयआरसीटीसी 500 ते 600 करोड जमा करण्याचा विचार करत आहे.
आयपीओ म्हणजे काय ? जेव्हा कोणतीही कंपनी पहिल्यांदाच सर्वसामान्य लोकांसमोर काही शेअर विकण्याचा प्रस्ताव ठेवते, तेव्हा त्या प्रक्रियेला आयपीओ म्हणतात. जेव्हा तुम्ही हे शेअर खरेदी करता, त्यावेळी तुम्ही कंपनीच्या शेअरमध्ये बरोबरीचे भागीदार असता. त्यानंतर शेअर स्टॉक एक्सचेंजमध्ये वापरले जातात.
भारतात आयपीओची संपुर्ण प्रक्रिया सेबीद्वारा पार पाडली जाते. सेबी हे शेअर बाजारावर नियंत्रित ठेवण्याचे कार्य करत असते. त्यामुळे कोणतीही कंपनी आयपीओ जारी करते, त्यावेळी सेबीची मंजूरी आवश्यक असते.
आयपीओ दोन प्रकारचे असतात. एक फिक्स्ड प्राइस आणि दुसरे बुक बिल्डिंग. फिक्स्ड प्राइसचा अर्थ म्हणजे, कंपनी आधीच शेअरची किंमत निश्चित करते. तर बुक बिल्डिंगमध्ये एक ठराविक रक्कम सांगण्यात येत असते, त्यानुसार तुम्हाला त्या शेअरवर बोली लावावी लागते. त्यानंतर कंपनी सांगते की, सर्वसामान्य लोकांसाठी किती शेअर्स आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel