हैदराबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक पाशवी बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी शुक्रवारी सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. तेलंगणा पोलिसांनी या एन्काऊंटरला दुजोरा दिला आहे. सर्व आरोपींना शुक्रवारी सकाळी ज्या ठिकाणी त्यांनी पाशवी कृत्य केले, तिथे नेण्यात आले होते. त्यावेळी चारही आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही जण मारले गेले. जिथे त्यांनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. तिथेच त्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. उड्डाण पुलाच्या खालीच ही घटना घडली.

 

चतनपल्ली येथे ज्या ठिकाणी महिला डॉक्टरचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळाला तेथे आरोपींना आज पहाटे 3 वाजता तपासादरम्यान नेण्यात आले. मात्र, हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यानंतर पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी दाद दिली नाही. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिसांनी चोघांवर गोळ्या झाडल्या. ही घटना आज पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जानर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

हैदराबाद जवळील चतनपल्ली गावात 26 वर्षीय डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचे देशात तीव्र पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी निदशर्न होत आहेत. या प्रकरणी 4 तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. या चारही आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. ज्या ठिकाणी महिला डॉक्टरला जाळून मारले तेथून जवळच पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केला.

 

दरम्यान, हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी आपसात तोंड देत होते. हे चार आरोपी पोलिस रिमांडात होते आणि त्यांना गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्ग -44 वर गुन्हेगाराच्या ठिकाणी नेण्यात आले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, गुन्हेगाराचे दृश्य सांगताना आरोपींनी पोलिस पक्षावर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी चकमकीतील चार आरोपींना ठार केले. मृतांचे मृतदेह ठोसावले जात असून घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या हैदराबाद बलात्कार प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रक कोर्टात होणार होती. या सुनावणीसाठी तेलंगणातील महबूबनगर या ठिकाणी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार होती. याप्रकरणी चारही नराधमांना अटक करण्यात आली होती चौघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत होते. यावेळी गुन्हा देखावा पुन्हा मिळवण्यासाठी पोलिसांनी आरोपीला एनएच -44 वर नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चारही आरोपींना ढेर केले आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: