देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे. परंतु तरीही रोजच्या रोज कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतो आहे. त्यामुळे देशभरात चिंतेच वातावरण आहे. आता याबाबत एक सकारात्मक बातमी आली आहे.


कोरोनाच्या संसार्गावर प्लास्मा थेरपी करण्यात आलेल्या एका रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात करण्यात आलेल्या या उपचाराबाबत ANI वृत्त विषयक संस्थेने माहिती दिली आहे.

‘दिल्लीतील साकेत भागातील मॅक्स रुग्णालयात प्लास्मा थेरपीसाठी दाखल केल्या गेलेल्या पहिल्या रुग्णाला, सकारात्मक परिणाम दिसून आले असून अलीकडेच त्याचे व्हेंटिलेटरही काढण्यात आल आहे. हा रुग्ण ४९ वर्षांचा, दिल्लीचा पुरुष असून ४ एप्रिलला त्याची चाचणी कोविड पॉझिटिव्ह आली होती : मॅक्स हेल्थकेअर’

 

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: