मुंबई : कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात हाहाकार घातला आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील आता एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. या मंत्र्याचे कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून या घटनेमुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान या मंत्र्याच्या संपर्कात आलेले सर्व मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. तसेच सदरील मंत्र्याला मुंबईतल्या फोर्टीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
चिंतेत टाकणारी बातमी म्हणजे नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोरोनाची बाधा झालेल्या सदरील मंत्र्याने हजेरी लावल्याची देखील माहीती मिळत आहे. राज्यात कोरोनाने हजारो रुग्ण बाधित झाले असतांना आता मंत्र्यालाही कोरोनाची लागण झाल्यानं मोठी चिंता निर्माण झाली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel