औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्यानं वाढ होत आहे. आज सकाळी शहरात 55 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर दुपारी चार रुग्णांची परत भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 747 झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या चार नवीन रुग्णांतील आलोक नगर, सातारा परिसर 01 रुग्ण, पुंडलिक नगर 01 रुग्ण, संजय नगर 01 रुग्ण, आणि बजाज नगर वाळूजमधील एका रुग्ण असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिला रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात 747 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून यातील 210 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर आतापर्यंत 19 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel