आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार की नाही हा सवाल होता, पण अखेर भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या भाजप-शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
उद्या होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीची घोषणा करतील आहे. भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा फार्म्युला अंतिम टप्प्यात असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे.
युतीच्या जागावाटपाच्या फार्म्युल्यावर आज रात्री शिक्कामोर्तब केले जाणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री युतीची घोषणा करतील. दरम्यान थोड्यावेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी आमदारांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवली आहे.
या बैठकीत युतीच्या फार्म्युल्यावर चर्चा होणार आहे. तसेच ज्या जागांवर वाटाघाटी होतील त्या आमदारांना बैठकीत विश्वासात घेण्याचे काम उद्धव ठाकरे करतील. मुख्यत: पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणच्या काही जागांचा पेच उद्धव ठाकरे कसे हाताळतील हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel