बीजिंग: श्रीमंत नवरा भेटला की बायकोला राणीसारखे जगता येते. काही मुली लग्नासाठी मुद्दाम श्रीमंत मुलगा बघतात तर काही मुली मुलगा श्रीमंत बघूनच पटवतात. पण हे प्रत्येकालाच जमत नाही. पण यावर आता चिंता नाही. श्रीमंत नवरा कसा पटवावा याची शिकवणी आता सुरू झाली आहे. श्रीमंत नवरा पटवण्याचे क्लास एका चिनी महिलेने सुरू केले आहेत.
याबाबत चायना डेली न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एका गर्भश्रीमंताला चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडु या शहरातील सू फेई (४२) हिने पटविले आणि त्याच्याशी विवाह केला. आता ती शिकवणी वर्गात विवाहोत्सुक श्रीमंत मुलांना कसे शोधावे, त्यांची ओळख काढून त्यांच्या निकटवतीर्यांमध्ये कसे सहभागी व्हावे आणि नंतर विवाहापयर्यंत कशी मजल मारावी, याची शिकवणी सू फेई देते. ती ही शिकवणी देण्यासाठी १० हजार युआन म्हणजे सुमारे ९० हजार रुपये ऐवढी फी आकारतात. येथील या अभ्यासक्रमात श्रीमंत पती कसा पटवावा, याचेच शिक्षण प्रामुख्याने दिले जाते.
सू फेई हिने वयाच्या ३७ वर्षी एका कोट्याधीशाशी विवाह केला. ग्वांगडॉंग प्रांतातील शेन्झेन शहरात आता ती राहते आणि तिथेच त्यांनी सात वर्षांपूर्वी वर्ग सुरू केला आहे. त्यांच्या वर्गात प्रवेशासाठी पहिल्याच वर्षी १०० तरुणींनी अर्ज भरले होते. यात मिळणारे शिक्षण म्हणजे तुम्हाला श्रीमंत पती मिळवायचा असेल, तर त्याचे छंद काय आहेत हे जाणून घ्या. ते सातत्याने ज्या ठिकाणांना भेट देतात, त्या ठिकाणांची माहिती मिळवा आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या नेहमी नजरेस पडाल याची दक्षता घ्या. अचानक भेट झाल्याचा आभास निर्माण करून त्यांची ओळख काढा आणि तुमचेही तेच छंद असल्याचे त्याला पटवून द्या, अशा खास टिप्स त्यांच्या वर्गात देण्यात येतात.
यासोबतच पहिल्या भेटीत बसण्याची जागा कशी निवडावी, की ज्यामुळे तुमचा चेहरा गोड दिसेल. अशा टिप्सही दिल्या जातात, तसेच हॉटेलमध्ये जेवणासाठी खूप महाग पदार्थ मागवू नका आणि महागड्या भेटवस्तूही स्वीकारू नका. असेही यात शिकवले जाते. श्रीमंत तरुणांची प्रामुख्याने शिक्षक, डॉक्टर आणि सरकारी सेवेत असणार्यांना पसंती असते. हवाई सुंदरी, पत्रकार आणि दुकानदार त्यांना आवडत नाहीत.
यासोबतच मुलगा पटवल्यानंतर तो जर लवकर लग्न करत नसेल तर काय करावे याचे प्रशिक्षणही त्या देतात. त्या म्हणतात की दोन वर्षांपासून एखादा श्रीमंत तरुण तुमच्याबरोबर फिरत असला आणि तरीही लग्नाचा प्रस्ताव मांडत नाही, असे तरुण तुमच्याशी विवाह करण्यास उत्सुक नसतात. एखाद्या श्रीमंत तरुणाशी विवाह झाल्यानंतर पहिल्या वर्षात उधळपट्टीबाबत संयम पाळा, असेही त्या विशेषत्वाने सांगतात. या वर्गात प्रशिक्षण घेतलेल्या किती जणींना श्रीमंत पती मिळाले, हे मात्र हे वृत्त देणार्या चायना डेली न्यूजने दिलेले नाही.
click and follow Indiaherald WhatsApp channel