ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीम मधील अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई होत आहे. १४ मार्च ला त्याने भारतीय वंशाची विनी रमण हिच्यासोबत खास भारतीय पद्धतीने साखरपुडा केला. या समारंभाचे फोटो विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर केले आहेत. वास्तविक या दोघांचा साखरपुडा मागच्या महिन्यात झाला होता पण आत्ता त्यांनी खास भारतीय पद्धतीने पुन्हा साखरपुडा केला आहे.
विनीने फोटोखालच्या कॅप्शन मध्ये भारतीय पद्धतीने साखरपुडा असे लिहिले आहे. या फोटोत ग्लेन भारतीय वेशात म्हणजे कुर्ता पायजमा तर विनी लेहंगाचोली वेशात दिसत आहे. ग्लेनने स्वतः सुद्धा साखरपुडा झाल्याचे व लवकरच विवाह करत असल्याचे म्हटले आहे. हा कार्यक्रम मेलबोर्न येथे झाला, ग्लेन व विनी एकमेकांना २०१७ पासून डेट करत आहेत. विनी फार्मासिस्ट आहे. या साखरपुड्याला त्यांचे जवळचे मित्र व नातेवाईक उपस्थित होते.
भारतीय वंशाच्या मुलीशी साखरपुडा करणारा ग्लेन दुसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. या अगोदर ऑस्ट्रेलियन गोलंदाज शॉन टेट याने भारतीय वंशाच्या मुलीशी लग्न केले आहे. ग्लेनच्या हातावर नुकतीच शत्रक्रिया झाल्यामुळे द. आफ्रिका दौऱ्यावर तो जाऊ शकला नव्हता.
click and follow Indiaherald WhatsApp channel