मागील काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती ओढावली आहे. त्यात सांगली, सातारा आणि कोल्हापूरचे लाखो लोक बेघर झाले आहेत. याच संदर्भात अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी ट्‌विटवरुन काळजी व्यक्त केली आहे. तसेच पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी सरकारचे धोरण बिल्डर्सना झुकते माप देणारे असल्याचा टोला फडणवीस सरकारला लगावला आहे.

रेणूका शहाणे यांनी ट्‌विटवरुन पूरग्रस्तांना मदत करायची असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसंदर्भात काही माहिती असल्यास मला सांगावे असे म्हटले आहे.                     

कोणी मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीची लिंक देऊ शकेल का? कल्याण, ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, कराड आणि कोल्हापूरमधील लाखो नागरिकांना पूराचा फटका बसला आहे. त्यांना आपली गरज आहे, असं शहाणे यांनी पहिल्या ट्‌विटमध्ये म्हटले.                                                                                                                           

Find out more: