एमएसएमई सेक्टरमध्ये लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी आधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. काम पूर्ण करा, अन्यथा नागरिकांना सांगून धुलाई करू, असा इशाराच गडकरी यांनी दिला.

आठ दिवसात समस्या सोडवा अन्यथा लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन अशी धमकीच आपण परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. तसेच आपण लालफितीच्या कारभराच्या विरोधात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लालफितीच्या कारभरावर नाराजी व्यक्त करत गडकरी म्हणाले, आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेक परिवहन निरीक्षक लाच घेतात. त्यांची प्रकरणे माझ्यासमोर उघड होतात. त्या लोकांना मी सांगू इच्छितो की, मी लोकांमधून निवडून आलो आहे. मी लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. जर तुम्ही चोरी करत असाल तर मी तुम्हाला एक चोर म्हणेन. तसेच या अधिवेशनात सहभागी झालेल्या उद्याजकांना कुठलीही भिंती मनात न बाळगता व्यवसाय करा अधिकारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत असेही त्यांनी सागितले.

तसेच ते पुढे म्हणाले, लोकांच्या समस्या आठ दिवसात सोडवल्या नाहीत तर नागरिकांच्या हातात कायदा देऊन त्यांना तुमची धुलाई करा अशी तंबी दिली आहे. जी व्यवस्था न्याय देत नाही तिला आपण फेकून द्यायला हवे असे आपल्या शिक्षकांनी शिकवल्याचेही गडकरी पुढे म्हणाले.                   


Find out more: