महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होईल. विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, “निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवाची घोषणा महाराष्ट्रामध्ये केली आहे. मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो आणि या घोषणेचे स्वागत देखील करतो.”
“त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांनी प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा. सध्या महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या या सूचनेचे सर्वच राजकीय पक्ष याचे तंतोतंत पालन करतील अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.”
तसेच “लोकशाहीचा महोत्सव खुल्या आणि चांगल्या वातवारणात पार पाडू असा माझा विश्वास आहे. माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा”, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel