अमेरिकेचा दौरा आटोपून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे मायदेशी परतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी काश्‍मीरचा सुर आळवला. अमेरिकेतून परत आल्यानंतर इम्रान खान यांनी, जगाने जम्मू-काश्‍मीरच्या बाबतीत आपली साथ दिली नाही तरी चालेल पण आपण कायम काश्‍मीरच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून जिहाद करणार असल्याचे म्हटले.

संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या देशाची भूमिका मांडल्यानंतर इम्रान खान यांनी पाकमध्ये प्रवेश केल्यानंतर विमानतळावरच आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा जिहादची भाषा बोलली. “जर जग काश्‍मिरींच्या मुद्यांवरून आपल्या पाठीशी नसेल तर काही हरकत नाही.” आम्ही नेहमीच काश्‍मीरी जनतेला समर्थन देऊ. असे करणे म्हणजे जिहाद करण्यासारखे असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले.

तसेच आम्ही हे करत आहोत कारण आम्हाला अल्लाहला खुश करायचे आहे. जेव्हा वेळ आपली साथ देत नाही तेव्हा आपण आशा सोडू नये असे सांगत काश्‍मीरच्या जनतेच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे कायम उभे राहणार आहोत आणि एक दिवस आम्ही नक्‍कीच इथल्या जनतेला न्याय देऊ असा विश्‍वासदेखील यावेळी इम्रान खान यांनी व्यक्‍त केला.                                                                       


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: