भाजपने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला सहा जागा सोडल्या आहेत. त्यापैकी चार मतदारसंघांतील उमेदवार आठवले यांनी जाहीर केले होते. फलटणमधून पक्षाचे उपाध्यक्ष असलेले दीपक निकाळजे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून आगाव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
बुधवारी फलटणमधून रिपब्लिकन पक्षाने छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली. आता त्यांच्या जागी दिगंबर आगाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निकाळजे यांची उमेदवारी भाजपमधून विरोध होत झाल्याने नाकारल्याचे समजते.
पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांना मानखुर्द-शिवाजीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याशिवाय आमदार मोहन फड (पाथरी), राजेश पवार (नायगाव), अरविंद भालाधरे (भंडारा) व डॉ. विवेक गुजर (माळशिरस) अशी रिपब्लिकन पक्षाच्या अन्य उमेदवारांची नावे आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel