भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी अजित पवार भावनिक होवून पत्रकार परिषदेत रडले त्यावर आपण काय म्हणाल, यावर त्यांनी आपल्या गंमतीदार शैलीत उत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, अरे नाटकं करत्यात अजित पवार, का रडतात ते? कशासाठी रडतात, शरद पवारांवर ईडीने गुन्हे दाखल केले म्हणून रडतात? असं रावसाहेब दानवे म्हणाले.
यावर पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, 'दुनिया सब जानती है, भानगड काय आहे, सर्वांना माहित आहे'
अजित पवार यांच्या राजीनाम्यावर बोलताना, रावसाहेब दानवे म्हणाले, राजीनामा देण्याला महत्व काय? आचारसंहिता सुरू झाली आहे, निवडणूक लागलीय, नाटकं आहेत ही सर्व.
तसेच अजित पवार यांनी प्रेशर आमच्यावर नाही आणायचं, प्रेशर हे घरच्यांवर आणायचं असं देखील रावसाहेब दानवे यांनी बोलताना सांगितलं.
click and follow Indiaherald WhatsApp channel