दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक प्रदर्शित करण्यात आले आहे. पुस्तकाचे नाव ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे आहे.
या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर भाजपाकडून पडदा टाकण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे वादग्रस्त लेखक जयभगवान गोयल यांनी अखेर माफी मागितली आहे. तसेच, हे पुस्तक देखील मागे घेण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
जावडेकर ट्विटद्वारे म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही”.
त्यानंतर पुन्हा ट्विटद्वारे त्यांनी पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नाही. असे स्पष्ट केले. ते म्हणतात, “नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे”.
त्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय मीडिया को हेड डॉ. संजय मयुख यांनी देखील ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे की,” एका लेखकाने मांडलेले विचार आहेत. या पुस्तकाला नावही जयभगवान गोयल यांनीच दिलं आहे. त्यामुळे या पुस्तकाशी पक्षाचा काही संबंध नाही”.
click and follow Indiaherald WhatsApp channel